पाटस येथे दिड एकर ऊस शॉर्टसर्किट होवुन जळाला

वरवंड- पाटस (ता. दौंड ) गावातील मोहिते मळा येथील राघु गुलाबराव वणवे या शेतकऱ्याच्या उसाच्या शेतातून गेलेल्या वीजवाहक तारांमधे शॉर्टसर्किट झाले. यावेळी खाली ठिणग्या पडल्याने दीड एकर ऊस पेटून त्यांचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
पाटस गावातील मोहिते वस्ती येथील गट नंबर 612/8 मध्ये राघु गुलाबराव वणवे या शेतकऱ्याच्या दीड एकर क्षेत्रात उसाचे पीक होते. या त्यांच्या शेतातुन विद्युत कंपनीच्या वीजवाहक तारा गेल्या आहेत. रविवारी (दि. 20) दुपारी साडेतीनच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन या परिसरात ठिणग्या पडल्या. यावेळी 1 जून 2017 ची लागण असलेला 86032 कोईमतुर जातीचा 11 महिन्यांचा ऊस जळाला आहे. या जळालेल्या उसाच्या क्षेत्राची पाहणी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी मुलाणी यांनी केली आहे. तर या ऊस जळीताबाबत पाटस येथील गावतलाठी आणि पंचांनी पंचनामा केला आहे. या घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झालेले असून, झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी राघु वणवे या शेतकऱ्याने केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)