पाटस बस डेपोसाठी परिवहन मंत्र्यांना निवेदन

वरवंड- विद्यार्थी आणि नागरिकांच्या सोयीसाठी पाटस येथील नियोजित जागेवर बस स्थानक बांधण्याची मागणी शिवसेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महेश पासलकर यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली आहे. तसेच त्यांना निवेदन ही दिले आहे.
मागील अनेक वर्षांपासून पाटस येथील नागरिक बस स्थानक बांधण्याची मागणी करीत आहेत. या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा उपोषण केले होते. पाटस येथे बस स्थानक झाल्यास आसपासच्या गावातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. तसेच अबालवृद्धांची होणारी गैरसोय टाळता येणार आहे. यासाठी लवकरात लवकर नियोजित जागेवर बस स्थानक बांधण्याची मागणी पासलकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)