पाटसला अज्ञात वाहनाच्या धडकेत वानराचा मृत्यू

वरवंड – सोलापूर महामार्गावर पाटस येथील मस्तानी तलावालागत एका वानराला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात त्याच्या डोक्‍याला गंभीर मार लागण्याने वानराचा जागीच मृत्यू झाला. पाटस गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गावर मस्तानी तलावानजिक शुक्रवारी (दि.15) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास चार ते पाच वानरे होती.

यामधील एका वानराला एका अज्ञात वाहनाने धडक देऊन अपघात झाला. यामध्ये डोक्‍याला मोठी जखम झाल्याने वानराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती वनकर्मचारी यांना मिळताच अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले. यावेळी वन कर्मचाऱ्यांना मृत्यूमुखी पडलेल्या वानराचा ताबा घेण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागले. यावेळी वानराचे सहकारी वानरे आणि वनकर्मचारी यांच्यात चांगली ओढाताण झाली.

मृत्यू पडलेल्या वानराचा ताबा घेण्यासाठी एक तास परिश्रम घ्यावे लागले, असे उपस्थित नागरिकांनी सांगितले. दरम्यान, दौंड येथील विभागीय कार्यालय येथे डॉ. शेख यांनी मृत्यू पावलेल्या वानराचे शवविच्छेदन केले असून तसेच अज्ञात वाहनावर गुन्हा दाखल केला आहे, असे वनकर्मचारी पद्मिनी कांबळे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)