पाटसमध्ये कॅण्डल मार्च

वरवंड-काश्‍मीरच्या कठूआ व युपीच्या उन्नावमध्ये झालेल्या बलात्कार विरोधात व आरोपींना मिळणाऱ्या राजकीय पाठबळ व तपासात होणाऱ्या हलगर्जी विरोधात पाटस अलंकार चौक ते मेन चौकापर्यंत या दुष्कृत्याच्या निषेधार्थ दौंड तालुका कॉंग्रेस, युवक कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शांती कॅण्डल मार्च काढण्यात आला.
यावेळी भाजपा सरकारचा तीव्र निषेध करुन पीडित मुलींना श्रद्धाजंली वाहण्यात आली. यावेळी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल सावंत, जिल्हा समन्वयक अशोक फरगडे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष पोपटराव ताकवणे, युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष अतुल जगदाळे, इस्माईल सय्यद, तन्मय पवार, सोमनाथ सोनवणे, योगेश बंदीष्टी, अमित थोरात, महेश जगदाळे, अरविंद दोरगे, विठ्ठल दोरगे, मोहसिन तांबोळी, अल्ताफ शेख, वजीर शेख, आजम सय्यद, शाहनवाज शेख, मुसा शेख, जाकिर बागवान, जहीर शेख, शाहरुख पठाण, समीर शेख, जुबेर भैलिमकर, इलियास शेख, नासिर मुलाणी, रिजवान शेख ई. कार्यकर्ते नागरीक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)