पाटबंधारे विभागाची शाखा झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा

रेडा- ब्रिटिश कालावधीत 1937 मध्ये निमसाखर (ता. इंदापूर) येथे पाटबंधारे विभागाचे तब्बल दोन तालुक्‍यातील शेतीच्या सिंचनाच्या कारभाराचे कार्यालय अस्तित्त्वात होते मात्र, कित्येक वर्षांपासून हे कार्यालय जीर्ण झाल्याने बंद ठेवले आहे; परंतु निमसाखर भागातील शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी निमसाखरला शाखा कार्यालय सुरू करा, अशी मागणी जलतज्ज्ञ सुर्यकांत रणवरे-पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे नुकत्याच इंदापूर दौऱ्यावर होत्या त्यावेळी त्यांनी रणवरे पाटील यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी वरील मागणी केली. याप्रसंगी आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे सभापती प्रवीण माने, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ शशिकांत तरंगे, जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजीत तांबिले उपस्थित होते. इंदापूर व माळशिरस या दोन तालुक्‍यातील शेतीच्या सिंचनाच्या पाण्यांचे नियोजन निमसाखर येथिल कार्यालयातून ब्रिटिश कालावधीत केले जात होते. या ठिकाणी तब्बल पाच एकर पाटबंधारे विभागाच्या मालकीची जागा आहे व जुना घोड्याचा पागा, जीप, चार चाकी वाहनांचे गॅरेज तसेच सेवकांची राहण्याची वसाहत, उपहारगृह अशी सुविधा या पाटबंधारे कार्यालयात होती मात्र, हे कार्यालय जुने झाले असून जागा धुळखात पडली आहे. पाटबंधारे विभागाचे नव्यानेच सुरू झालेले उपविभागीय कार्यालय निमगाव केतकी येथे आहे याच कार्यालयाची एक शाखा निमसाखर परिसरासाठी दिली तर सिंचनाची व्यवस्था नियोजन तसेच शेतकऱ्यांना सोयीचे ठरणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
शेतकऱ्यांना जर हे कार्यालय सोयीचे ठरणार असेल तर तातडीने लक्ष घालून हा विषय मार्गी लावेन असा शब्द खासदार सुप्रिया सुळे यांनी रणवरे-पाटील यांना दिला.

  • पाटबंधारे विभागाचा धाक नाही
    इंदापूर तालुक्‍यातील निमसाखर गावच्या हद्दीत तब्बल एक हजार एकर क्षेत्र पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत पाणी नियोजनात असते; परंतु या कालव्यावरती तसा पाहिला तर पाटबंधारे विभागाच्या अधिकारी वर्गाचा धाक नसल्यामुळे अपुरे सिंचन होते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही; परंतु या ठिकाणी पाटबंधारे विभागाची शाखा झाली तर पाटबंधारे विभागाचा कारभार सोयीचा होणार आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
518 :thumbsup:
426 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)