पाटण वन विभागातील योजनांना 10 दिवसात मान्यता

काळगाव – पाटण विधानसभा मतदारसंघातील वन विभागाच्या हद्दीत येणाऱ्या एक हेक्‍टरच्या आतील रस्त्यांच्या व पिण्याच्या पाण्याच्या योजनांच्या कामांना मान्यता मिळण्याबाबत आ. शंभूराज देसाई सुरवातीपासूनच आग्रही आहेत. पाटण मतदारसंघातील जे प्रस्ताव 1 हेक्‍टरच्या आतील आहेत त्यास तात्काळ मान्यता देण्याचे अधिकार जिल्हा वनसंरक्षक यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार राज्य शासनाच्या अखत्यारितील या प्रस्तावांना येत्या 10 दिवसाच्या आत मान्यता देणार असल्याची घोषणा राज्याचे वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी विधानसभेत केली.

पाटण आणि कराड तालुक्‍यातील मौजे गणेवाडी ठोमसे, हुंबरणे, कसणी धनगरवाडा, कोळेकरवाडी(डेरवण), जळव डफळवाडी, पांढरेपाणी, नागवाणटेक (पाचगणी), पाणेरी (धनगरवाडा), निवी, आटोली, पाळेकरवाडी (बहूले), बेलदरे व म्होर्पे या तेरा गावांना व वाडयावस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची व पिण्याच्या पाण्याच्या योजनांची कामे करण्यासाठी वनविभागाच्या हद्दीतील मान्यता मिळण्याबाबतचा तारांकीत प्रश्न आ. देसाई यांनी उपस्थित केला.

वनमंत्री ना. मुनगंटीवार यांनी वनविभागाच्या मान्यतेकरीता येणारे जे प्रस्ताव 1 हेक्‍टरच्या आतील आहेत त्यास तात्काळ मान्यता देण्याचे अधिकार जिल्हा वनसंरक्षक यांना आहेत. मात्र 1 हेक्‍टरवरील प्रस्ताव हे केंद्राकडे मान्यतेकरीता सादर करावे लागतात. तारांकीत प्रश्न झाल्यानंतर आ. देसाई यांच्याबरोबर वन विभागाचे सचिव आणि त्यांच्या विभागातील सर्व अधिकारी यांची बैठक घेण्याच्या सूचना वनसचिव यांना देतो आणि पाटण मतदारसंघातील जे प्रस्ताव 1 हेक्‍टरच्या आतील आहेत त्या प्रस्तावांना येत्या 10 दिवसात मान्यता देण्याच्या सुचना करतो. जे प्रस्ताव केंद्र शासनाकडे मान्यतेकरीता सादर करावयाचे आहेत, ते तात्काळ तयार करुन केंद्र शासनाकडे सादर करावेत अशा सक्त सुचना वन विभाग व जिल्हा वनसंरक्षक यांना देत असल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)