पाटण तालुक्‍यातून चारजण वर्षभरासाठी तडीपार

पाटण, दि. 29 (प्रतिनिधी) – अवैध मटका चालविणाऱ्या चार जणांना नुकतेच पाटण पोलिसांनी चार तालुक्‍यांतून तडीपार केले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक यू. एस. भापकर यांनी याबाबतची माहिती दिली.
दिलीप संपत भिसे, प्रविण कानाजी मालडे, प्रदीप बापुराव पुजारी सर्व रा. नाडे (नवारस्ता )पाटण आणि तानाजी किसन सत्रे रा. अडूळ या चार जणांना एक वर्षासाठी पाटण कराड चिपळूण आणि सातारा या चार तालुक्‍यांतून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. हे चारही जण मटका व्यवसाय चालवत होते. त्यांच्यावर अनेकवेळा गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सातारा जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांच्या आदेशानुसार पाटण तालुक्‍यातील चार जणांवर तडीपारचे आदेश देऊन त्यांना सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सातारा, पाटण, चिपळूण आणि कराड या चार तालुक्‍यातून हद्दपार करण्यात आले आहे. त्यामुळे पाटण तालुक्‍यातील अवैद्य व्यवसाय क्षेत्रात खळबळ उडाली आहे सर्व आरोपींवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्नव्ये ही कारवाई करण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भापकर यांनी सांगितले.
दरम्यान काही महिन्यापूर्वीही तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांच्या आदेशाने पाटण तालुक्‍यातील पाच जणांना तडीपार केले होते. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा तालुक्‍यातील आणखी चारजण तडीपार झाल्याने तालुक्‍यातील अवैद्य व्यवसायिकांमधून खळबळ उडाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)