पाटण तालुक्‍यातील वंचित 106 गावांचा सुधारित दुष्काळग्रस्त यादीत समावेश 

कराड – दुष्काळ यादीत समावेश नसल्यामुळे अनेक लाभांपासून वंचित राहिलेल्या चाफळ, तारळे, मल्हारपेठ व तळमावले मंडलातील 106 गावांचा सुधारित दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला असल्याची माहिती आ. शंभूराज देसाई यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई येथे नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनातील कामकाजाची माहिती देण्यासाठी आ. देसाई यांनी कराड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांना पाटण विधानसभा मतदार संघाच्या अनुषंगाने अधिवेशनात मांडलेल्या विषयाची माहिती दिली.

-Ads-

ग्रामपंचायतीमध्ये काम करणारे संगणक परिचालक व पोलीस पाटलांच्या मानधनाच्या प्रश्नावर ग्रामविकास मंत्री पंकजा
मुंडे व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करण्यात आली असून लवकरच त्यांच्या मानधन वाढीसह विविध प्रश्नांची सोडवणूक केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. पाटण विधानसभा मतदारसंघात नव्याने 16 कोटी 42 लाख रुपयांच्या रस्त्यांच्या कामांना मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळवण्यात आली आहे. विधानसभा अधिवेशनात दुष्काळाच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. यावेळी पाटण विधानसभा मतदारसंघातील चाफळ, तारळे, मल्हारपेठ व तळमावले मंडलातील 106 गावांचा नव्याने दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

मोरणा-गुरेघर प्रकल्पांतर्गत वंचित असलेले 2156 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी फेर सर्वेक्षण करण्याची मागणी लक्षवेधीद्वारे केली आहे. येत्या अधिवेशनात यावर चर्चा होवून हा प्रकल्प मार्गी लागेल. मुंबई येथे अधिवेशन काळात ग्रामपंचायतीचे संगणक परिचालक व पोलीस पाटील संघटनांचे आंदोलन सुरु होते. त्याठिकाणी भेट देऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले. त्यांच्या प्रश्नावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. लवकरच याबाबत संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक होऊन निर्णय घेतले जातील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)