पाटण तालुक्‍यातील ग्रामपंचायतीसाठी आज मतदान

संग्रहित छायाचित्र

पाटण – पाटण तालुक्‍यातील आठ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या सात सदस्य पदांच्या 55 जागेसाठी आज मतदान होणार आहे. सदस्यत्वाच्या 55 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत 120 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत तर सरपंचपदाच्या सात जागेसाठी अठराजण निवडणूक लढवत आहेत. एकूण 138 उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीतबंद होणार आहे.

तालुक्‍यातील 11 सार्वत्रिक तर 72 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यामध्ये सार्वत्रिक निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतींपैकी मल्हारपेठ, नारळवाडी, मरळी, गव्हाणवाडी, कळकेवाडी, मुंद्रळकोळे, मुंद्रळकोळेखुर्द, रामिष्टेवाडी, नवसरवाडी, येराडवाडी, जामदारवाडी या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तर पोटनिवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींमध्ये कोचरेवाडी, माथणेवाडी, शिंगणवाडी, बोडकेवाडी, चव्हाणवाडी, जाधववाडी, बांधवट, पाबळवाडी, धायटी, तामिणे, पाळशी, पाणेरी, सातर, घोटील, कोळेकरवाडी, उमरकांचन, शितपवाडी, कराटे, नाणेल, गोषटवाडी, गोठणे, कोदळ पुनर्वसन, धजगाव, शिंदेवाडी, डिगेवाडी, डिगेवाडी, सांगवड, लुगडेवाडी, कसणी, पाचुपतेवाडी, डाकेवाडी, सुपुगडेवाडी, चव्हाणवाडी, मस्करवाडी, मत्रेवाडी, आसवलेवाडी, कावरवाडी, तामकडे, डोंगळेवाडी, आंबेघरमरळी, काहीर, पाचगणी, गोकुळ तर्फ हेळवाक, वाडीकोतावडे, लेंढोरी, गुंजाळी, किल्लेमोरगिरी, काठी, घाणव, चाफोली, आंबवणे, वाटोळे, कारवट, कावडेवाडी, टोळेवाडी, मणदुरे, धडामवाडी, भिलारवाडी, मान्याचीवाडी, साबलेवाडी, शेंडेवाडी, चाळकेवाडी, मानेगाव, चिखलेवाडी, डांगिष्टेवाडी, जळव, भुडकेवाडी, वेखंडवाडी, कळंबे, मुंद्रुळहवेली, जरेवाडी, हावळेवाडी, नहिंबे चिरंबे, या ग्रामपंचायतींचा समावेश होता.

मात्र पोटनिवडणूक लागलेल्या ग्रामपंचातीमध्ये केवळ तीन ग्रामपंचायतींना उमेदवार मिळाले. तर 68 ग्रामपंचायतीच्या जागा आरक्षित असल्याने रिक्त राहिल्या आहेत. सार्वत्रिक निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये कळकेवाडी, रामिष्टेवाडी, नवसरवाडी या ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. तर आज मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये येराडवाडी, जमदाडवाडी, नारळवाडी, मल्हारपेठ, मद्रुळकोळे, मंद्रुळकोळेखुर्द, मरळी, गव्हाणवाडी या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान होत आहे. या ग्रामपंचायतींसाठी असणारे एकूण मतदान पुढीलप्रमाणे-येराडवाडी 487, जमदाडवाडी 500, नारळवाडी 990, मल्हारपेठ 3677, मद्रुळकोळे 2708, मंद्रुळकोळेखुर्द 1162, मरळी 2529, गव्हाणवाडी 562 एवढे मतदान आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)