पाटणला पाच तास चालला जनता दरबार

185 तक्रारी दाखल; काहींचा जागेवरच निपटारा

पाटण – आमदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून तालुक्‍यातील जनतेच्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी शुक्रवारी पार पडलेल्या जनता दरबारात 185 तक्रारी दाखल झाल्या. यापैकी बऱ्याच तक्रारी रेशनिंग कार्ड आणि धान्य मिळत नसल्याच्या असल्याचे निदर्शनास आल्याने आ. देसाई यांनी याबाबत येत्या तीन दिवसात स्वतंत्र बैठक घेणार असे जाहीर केले.

मेंढोशी येथे घरकूल घोटाळा झाल्याची तक्रार आणि फेरफार वारस नोंद करणेसाठी तलाठी व सर्कल पैसे मागतात. साखरी गावचे बिट हवालदार तक्रारीची दखल घेत नाहीत, जमीन मोजणीसाठी पैसे भरुन सुध्दा चार चार वर्षे उलटली, तरी मोजणी केली जात नाही, घाणबी गावात लोकांना पाणी मिळत नाही, डोक्‍याने लोकांना पाणी आणावे लागत आहे. शिरळ येथील शेतकऱ्यांना कोयना नदीवरुन पाणी उपसण्याचा परवाना देण्यात यावा, अशा तक्रारी दाखल झाल्या होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तहसीलदार कार्यालयाचे प्रांगणात आयोजित जनता दरबारात रवीराज देसाई, पोलीस उपअधिक्षक अंगद जाधवर, गटविकास अधिकारी संजीव गायकवाड, नायब तहसीलदार विजय माने, उपप्रादेशिक परिवहन विभाग कराडचे नीलकंठ पाटील, सपोनि यू. एस. भापकर, नायब तहसीलदार लोंढे, अव्वल कारकून ए. ए. मुलाणी तसेच बांधकाम, वनविभाग, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जनता दरबारमुळे मिळाले रेशनिंग कार्ड
उरुल येथील इंदुताई राजाराम देसाई यांनी 4 सप्टेंबर रोजी रेशंनिग कार्ड मिळावे, म्हणून पुरवठा शाखेत अर्ज केला होता. त्याची आजतागायत दखल घेतली नसल्याने अखेर इंदूताई देसाई यांनी जनता दरबारात आ. शंभूराज देसाई यांचेकडे तक्रार केली. अन्‌ काही मिनिटात त्यांना रेशनिंग कार्ड मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)