पाटणमध्ये 11 रोजी भरणार जनता दरबार

काळगाव – पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या अडचणी व समस्यांचा जागेवर निपटारा करण्याकरीता पाटणचे उत्कृष्ट संसदपटू आमदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि. 11 रोजी सकाळी 10 वा. जनता दरबारचे आयोजन करण्यात आले आहे.

पाटण तहसील कार्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या जनता दरबारामध्ये आ. देसाई हे पाटण मतदार संघातील सुपने मंडलसह जनतेच्या समस्यांची व विकास कामा संदर्भातील अडचणी जाणून घेणार आहेत. जनता दरबारास पाटण व कराड तालुक्‍यातील सर्व शासकीय यंत्रणांचे खातेप्रमुख व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनाही निमंत्रित केले आहे. जनतेने आपल्या समस्या घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार देसाई यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आमदार देसाई यांनी सन 2004 ते 2009 या काळात पहिल्यांदा जनता दरबाराचे आयोजन केले होते. त्यानंतर सन 2014 ला आमदार झाल्यानंतर पहिल्या महिन्यातच चारवेळेला जनता दरबार आयोजित केला होता. आता याच काळातील हा पाचवा जनता दरबार आहे. यास सर्वांनी आपल्या समस्या घेऊन उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)