पाटणमध्ये शुटिंग बॉल स्पर्धांचे दिमाखदार उद्‌घाटन

पाटण – पाटण तालुक्‍याचे माजी सर्वाजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री विक्रमसिंह पाटणकर (दादा) यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त येथील नगरपंचायत कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या श्रीमंत कै. सौ. उमादेवी पाटणकर क्रीडानगरीत राज्यस्तरीय शुटिंग बॉल स्पर्धांचा दिमाखदार उद्‌घाटन सोहळा पार पडला. पाटण नगरीच्या प्रथम नागरिक सौ. सुषमा महाजन व उपनगराध्यक्ष दीपक शिंदे यांच्या हस्ते मैदान क्र. 1 व 2 चे उद्‌घाटन करण्यात आले.

यावेळी पाटण नगरपंचयतीचे नगरसेवक सचिन कुंभार, संजय चव्हाण, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे विभागीय विकास अधिकारी अविनाश पाटील, सुनिल पानस्कर, विकास अधिकारी शंकरराव मोरे यांच्यासह पाटण स्पोर्टस असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी पाटण स्पोर्टस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल यादव, कोषाध्यक्ष दिनकराव जगताप, सचिव इलाही मोमीन यांनी श्रीफळ देवून स्वागत केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगराध्यक्षा सुषमा महाजन म्हणाल्या, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर दादांच्या वाढदिवसानिमित्त पाटण स्पोर्टस असोसिएशनने दीर्घकाळ स्पर्धांचे आयोजन करुन स्तुत्य उपक्रम राबविला आहे. स्पोर्टस क्‍लबमार्फत अनेक वर्षापासून शुटिंग बॉल स्पर्धांचे भव्य सामने भरविले जात आहेत. या स्पर्धांसाठी महाराष्ट्रासह दिल्ली, हरियाणा, राजस्थान, पंजाब याठिकाणाहून संघ सहभागी होत असतात.

प्रास्ताविक इलाही मोमीन यांनी केले. आभार इक्‍बाल हकीम यांनी मानले. यावेळी शिवराम कवडे, सी. के. देशमुख, गणपतराव साळुंखे, राजू कांबळे, जयवंत सुर्वे, राजेंद्र पाटणकर, मनोहर यादव, गणेश यादव, राजेंद्र गोविंदराव पाटणकर यांच्यासह क्रीडारसिक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)