पाटणमधील कोतवालांचे कामबंद आंदोलन

चतुर्थश्रेणीच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन

मल्हारपेठ – महसूल मधील कणा समजला जाणारा गावपातळीवरील काम करणाऱ्या कोतवालांच्या नशिबी स्वातंत्र्यानंतरही दारिद्रय अजून ही जात नाही. नुसत्या तुटपुंज्या मानधनवावर काम करीत असलेल्या कोतवालांच्या शासन दरबारी प्रलंबित मागण्यासाठी राज्यातील सर्व कोतवाल बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद धरणे आंदोलन करुन शासनाला जाग आणण्यासाठी सातारा जिल्ह्यातील कोतवाल बांधव धरणे आंदोलन करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या आंदोलनात पाटण तालुका कोतवाल संघातील सर्व सभासद ही सहभागी होऊन मागण्या मान्य होईपर्यत 100 टक्के काम बंद आंदोलन करणार असल्याचे निवेदन पाटणचे तहसीलदार रामहरी भोसले व उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व तलाठी संघटनेचे अध्यक्ष अमोल चव्हाण यांना देण्यात आले आहे.

राज्यातील कोतवालांना चतुर्थश्रेणी दर्जाबरोबर विविध मागण्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे सरकार सातत्याने दुर्लक्ष करीत असल्यामुळे अनेक राज्यात मोर्चे व धरणे आंदोलन करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील सरकारी महसूल सेवेतील 12 हजार 637 कोतवाल कर्मचाऱ्यांना शासन निर्णय महसूल व वन विभाग क्र. बैठक 2016 / प्र. क्रं. 581 / ई 10 दि. 18 मार्च 2017 रोजी अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग यांच्या अध्यक्षतेखाली सचिव समितीची स्थापना करुन एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु समितीने दोन वर्षाने आपला अहवाल सादर करताना एक छत्र योजना राबविण्यात आली आहे. यामध्ये पोलिस पाटील, आशा वर्कर व कोतवाल यांचा समावेश करुन सरकारने सर्वांच्याच तोंडाला पाणी पुसण्याचे काम केले आहे.

तसेच महसूल विभागात प्रत्यक्षपणे गाव पातळीवर अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारा कोतवाल अजूनही वंचितच आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना अधिनस्त राहून शासकीय शासकीय कामांची अंमलबजावणी करणे, तलाठी, पोलिस पाटलांना मदत करणे, नैसर्गिक आपत्ती, निवडणूका, शासकीय वसुली यासारख्या महत्त्वाच्या कामांमध्ये कोतवालांचा सहभाग असतो.

कोतवालांची मागणी शासन दरबारी पोहचवून योग्य न्याय द्यावा, अशी मागणी पाटण तालुका कोतवाल संघाचे अध्यक्ष मोहन कवर, उपाध्यक्ष निवास सुतार, सचिव कृष्णत सावंत, कार्याध्यक्ष मिलिंद मस्के, दिपक इंगवले, सोमनाथ पाटील, प्रविण उदुगडे, अजित सुर्वे, सुनिल कांबळे, किसन जाधव, दिपक सुर्वे, सुरेखा माळी, पुजा माने, साधना जाधव, शंकर गुरव, सर्कल विभाग प्रमुख व पदाधिकारी यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)