पाटणच्या गणेश, दिग्विजयचे राज्यस्तरीय बॅडमिंटनमध्ये यश

सातारा, दि. 21 (प्रतिनिधी)-विटा बॅडमिंटन असोसिएशन, विभागीय पत्रकार संघ आणि बळवंत महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत पाटणच्या गणेश सपकाळ व दिग्विजय पवार या जोडीने कोल्हापूरच्या अक्षय मनवाडकर व निनाद कामत यांचा पराभव करुन दुहेरीत विजेतेपद मिळविले.
विटा येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्तर्धेत राज्यभरातून 200 हून अधिक नामांकित खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेचे हे दुसरेच वर्ष होते. बळवंत महाविद्यालयाच्या इनडोअर स्टेडिअममध्ये ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धा तीन गटात खेळविण्यात आल्या. या स्पर्धेत पाटण येथील गणेश सपकाळ व दिग्विजय पवार या जोडीने सहभाग घेतला होता. पाटणच्या या जोडीने कोल्हापूरच्या अक्षय मनवाडकर व निनाद कामत यांचा पराभव करत विजेतेपद मिळविले. अक्षय आणि निनादच्या यशस्वी खेळीने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुराच रोवला आहे. या स्पर्धेत पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, कराड, सातारा, सांगली जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)