पाझर तलावाच्या मोजणीवेळी दोन गटात हाणामारी

प्रातिनिधिक फोटो

सासवड- गराडे (ता. पुरंदर) येथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत पाझर तलावाच्या बाधीत शेतकऱ्यांने आणलेल्या खाजगी मोजणीवेळी शेतकऱ्यांच्या दोन गटांत हाणामारी झाली आहे.
या प्रकरणी संजय एकनाथ रावडे (रा. रावडेवाडी, गराडे, ता. पुरंदर), विशाल गोकुळ रावडे, बाळू उर्फ यशवंत सदाशिव रावडे, म्हस्कू ज्ञानदेव रावडे, बाळू शंकर रावडे, अजीत बबन रावडे, सागर भानुदास रावडे, अनंता शिवराम रावडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शेतकरी बाळू बापू रावडे (वय 59, रा. रावडेवाडी, ता. पुरंदर) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी बाळू रावडे यांचे रावडेवाडी येथे 1 हेक्‍टर 14 आर क्षेत्र आहे. सदर क्षेत्रामध्ये जिल्हा परिषदेच्या मार्फत जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत पाझर तलावाचे काम सुरू असून याचा कोणताही मोबदला रावडे यांना मिळाला नसल्याने त्यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने पाझर तलावाच्या कामास मनाई केली आहे. तरीही आरोपी संजय रावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रावडे यांना त्यांच्याच क्षेत्रातून ये-जा करण्यासाठी मनाई केली असल्यामुळे त्यांच्या विरोधात कोर्टात दावा दाखल केला होता. त्याचा निकाल 18 जानेवारी 2018 रोजी बाळू रावडे यांच्या बाजूने लागला आहे. तेव्हापासून संजय रावडे यांचा बाळू रावडे यांच्यावर राग होता. 30 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वा.च्या सुमारास बाळू रावडे, त्यांचे भाऊ विठ्ठल रावडे आणि विकास रावडे यांनी पाझर तलावात क्षेत्र जाते की काय याची खात्री करण्यासाठी खाजगी मोजणी आणली होती. त्यावरून आरोपी व रावडे यांच्यात वाद झाला. तसेच आरोपींनी रावडे यांना मारहाण केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)