पाच हजार किलो भेसळयुक्त खवा जप्त

गुजरात “कनेक्‍शन’ : खासगी ट्रॅव्हल्स आणि तिघांवर कारवाई

पुणे – गणेशोत्सवात गुजरातमधील भेसळयुक्त खवा विक्रीस पाठविला जात असून आठवडाभरापूर्वी गुन्हे शाखेने 2 हजार किलो भेसळयुक्त खवा पकडला होता. त्यानंतर खासगी प्रवासी बसमधून पुण्यात विक्रीस पाठविलेला 4 हजार 852 किलो भेसळयुक्त गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकाने जप्त केला.

-Ads-

याप्रकरणात पोलिसांनी भेसळयुक्त खव्याची वाहतूक करणारी आराम बस जप्त केली आहे. तसेच बसच्या चालकासह तिघांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. गणेशोत्सवात मोदक आणी मिठाईला मोठया प्रमाणात मागणी असते. भेसळयुक्त खवा अतिशय कमी दरात मिळत असल्याने बहुतांश मिठाईवाले त्याचा वापर करताना दिसतात.

गणेशोत्सवात बाजारपेठेत भेसळयुक्त खवा विक्रीसाठी पाठविला जात असल्याची माहिती वाहनचोरी विरोधी पथकातील पोलीस नाईक शंकर संपत्ते यांना खबऱ्याने दिली. नीता ट्रॅव्हल्सची खासगी आराम बस स्वारगेट भागात आल्यानंतर पोलिसांनी बसची तपासणी सुरू केली. बसमधील पार्सल ठेवण्याच्या कप्प्यात खवा ठेवल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने या घटनेची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली. अधिकाऱ्यांनी खव्याची तपासणी केली. तेव्हा 4 हजार 852 किलो खवा भेसळयुक्त असल्याचे उघड झाले. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कारवाई केली.

बसचालक हिंमतसिंग गोपालसिंग राठोड (45 ,रा. अहमदाबाद, गुजरात) याच्यासह तिघांवर कारवाई करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक लगड, हवालदार सुनील पवार, शंकर संपत्ते, जितेंद्र तुपे, मोहन येलपले यांनी ही कारवाई केली. या कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी एस. पी. शिंदे, सहाय्यक आयुक्त पी. टी. गुंजाळ, म्हस्के यांनी सहाय्य केले.

मोठ्या शहरांत विक्री
गुजरातमधील भेसळयुक्त खव्याची विक्री पुणे, नागपूर, परराज्यांतील हैद्राबादसारख्या शहरात मोठ्या प्रमाणावर केली जात असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. डालडा, मैदा आणि दुधाचा वापर करुन हा भेसळयुक्त खवा बनवला जातो.

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)