पाच सराईतांकडून 29 मोबाईल जप्त

पिंपरी – पाच सराईत चोरट्यांकडून 1 लाख 32 हजार रुपये किंमतीचे 29 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने केली.

मयूर सुनील महाजन (वय 19, रा. त्रिवेणीनगर, तळवडे), अविनाश प्रकाश लोखंडे (वय-20, रा. विष्णू समुद्रे चाळ, विठ्ठलवाडी, देहूगाव), बाबा उर्फ शेंड्या राजेश मिसाळ (वय-31, रा. साई मंदिरामागे, वेणूनगर, वाकड. मूळ रा. समतानगर, परळीवेस, ता. अंबाजोगाई, ता. बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यासोबत दोन अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल चोरीचे प्रकार रोखण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके गस्त घालत असताना पोलीस नाईक फारूक मुल्ला यांना देहूरोड शितळानगरमध्ये दोन इसम चोरीचे मोबाईल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मयूर महाजन व त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. तसेच विठ्ठलवाडी येथील पेट्रोलपंपाजवळून अविनाश लोखंडे व त्याचा अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी विविध कंपन्यांचे 28 मोबाईल फोन चोरल्याचे सांगितले. हे मोबाईल फोन त्यांनी देहूरोड परिसरातून मागील एक वर्षभरात चोरले आहेत.

दुसऱ्या कारवाईमध्ये पोलीस नाईक फारूक मुल्ला यांना माहिती मिळाली की, एक मोबाईल चोर अंबाजोगाई येथे आहे. त्यानुसार त्याला त्याच्या मूळ गाव अंबाजोगाई येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून मोटो कंपनीचा एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे देहूरोड पोलीस ठाण्यातील चोरीचे दोन व जबरी चोरीचे दोन असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहाय्यक निरीक्षक सतीश कांबळे, उपनिरीक्षक हर्षल कदम, कर्मचारी जमीर तांबोळी, भीवसेन सांडभोर, संपत निकम, संजय गवारे, प्रवीण दळे, फारूक मुल्ला, मयूर वाडकर, नितीन बहिरट, संदीप ठाकरे, राहुल खारगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)