पाच वर्षात 789 बालकांवर हृदयशस्त्रक्रिया

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उपक्रम

पुणे- राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी आणि अनुदानीत शाळांमधील विद्यार्थ्यांची हृदय तपासणी करण्यात आली. मागील पाच वर्षांपासून (2013 ते 18) हे राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू असून, शून्य ते 18 वयोगटातील मुलांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तब्बल 1 हजार 71 मुले हृदयविकाराने ग्रस्त असल्याचे निदर्शनास आले. त्यापैकी 789 मुलांवर हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये 2017-18 या वर्षात सर्वाधिक म्हणजेच 223 मुलांवर हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली.

राज्य शासनाचा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद आणि जिल्हा शल्यचिकिस्क यांच्या संयुक्‍त विद्यमाने राबविला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत शून्य ते 18 वयोगातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येते. त्यामध्ये विशेषतः जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाडी आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते. त्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाने जिल्ह्यात 73 पथके नेमली आहे. या एका पथकात एक पुरुष डॉक्‍टर, एक महिला डॉक्‍टर, एक नर्स आणि औषध वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे. दर सहा महिन्याने ही तपासणी केली जाते. 2013 ते 14 ते 2017-18 या पाच वर्षांच्या कालावधीत केलेल्या तपाणीमध्ये तब्बल 1 हजार 78 मुलांना हृदयविकार असल्याचे निदर्शनात आले. त्यानंतर जिल्हा परिषद, जिल्हा चिकित्सक आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्‍त मदतीने त्यातील 789 मुलांवर राजीव गांधी जीवनदायी योजना तसेच इतर माध्यमातून शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

-Ads-

तसेच उर्वरित मुलांपैकी 46 मुलांच्या पालकांची शस्त्रक्रिया करुन घेण्याची तयारी नाही. तर 54 मुलांच्या प्रकृतीची माहिती घेतली जात आहे. तसेच 57 मुलांना शस्त्रक्रियेची गरज नसल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. तर, 49 मुलांवर औषधोपचार सुरू आहेत. 7 मुलांना अत्याधुनीक तपासण्यांची गरज आहे. तर, 30 मुलांचा आजार गुंतागुंतीचा असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया होवू शकत नाही. तसेच 8 विद्यार्थ्यांयांवर शस्त्रक्रिया करणे अवघड आहे. तर 20 मुले बाहेर गेली आहेत. तसेच दहा विद्यार्थ्यांवर लवकरच शस्त्रक्रिया होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)