पाच वर्षात 27 कर्जबुडवे परदेशात पळाले- अर्थ राज्यमंत्री 

नवी दिल्ली – गेल्या पाच वर्षात 27 कर्जबुडवे परदेशात पळून गेल्याची माहिती अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुक्‍ला यांनी दिली आहे. कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेल्या 27 पैकी 20 जणांविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यासाठी इंटरपोलला कळवण्यात आले असून इंटरपोलने त्यापैकी 8 जणांविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केलेली आहे आणि सहा आरोपींच्या प्रत्यार्पणाबाबत संबंधित सरकारांना कळवले आहे, अशी माहिती शुक्‍ला यांनी राज्यसभेत लिखित स्वरूपात दिली.

अंमलबजावणी संचलनालयाच्या अपीलावर 27 पैकी 7 जणांवर गुन्हेगारी आर्थिक अपराध कायदा 2012 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 50 कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज देताना कर्ज घेणाऱ्या कंपन्यांचे प्रमोटर्स, संचालक आणि अन्य अधिकाऱ्यांच्या पासपोर्टच्या प्रमाणित प्रती घ्याव्यात असा सल्ला सरकार बॅंकांना देत असते, असेही मंत्र्यांनी सांगितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

10 डिसेंबर रोजी लंडनच्या वेस्ट मिनिस्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयाने विजय माल्याच्या प्रत्यार्पणास मंजुरी दिलेली आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय तेथील सरकार घेणार आहे. भारतीय बॅंकांची सुमारे 9000 कोटी रुपयांची थकबाकी असलेला माल्या मार्च 2016 मध्ये लंडनला पळून गेला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)