पाच वर्षात रेल्वे भरती बोर्डाच्या उत्पन्नात 100 पट वाढ !

भोपाळ (मध्य प्रदेश): गेल्या पाच वर्षात रेल्वे भरती बोर्डाच्या उत्पन्नात 100 पट वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. रेल्वे भरती बोर्डाच्या परीक्षा या बोर्डाच्या उत्पन्नाचे मोठे साधन बनले आहे. परीक्षा फी च्या नावाखाली रेल्वे बोर्ड बेकार युवावर्गाकडून जे रक्कम वसूल करते, ती सन 2013-14 मध्ये 9 कोटी रुपये होती, ती आता 900 कोटीपर्यंत वाढली आहे.

सन 2000 ते सन 2013 पर्यंत पदवीधर नसलेल्यांकडून 40 रुपये आणि पदवीधर उमेदवारांकडून 60 रुपये परीक्षा फी घेतली जात असे, सन 2014 मध्ये ती 100 रुपये करण्यात आली. ती सन 2016 मध्ये 500 रुपये करण्यात आली आहे. आणि त्यात एक अट अशी आहे, की जे उमेदवार परीक्षेला बसतील त्यांच्या परीक्षा फीपैकी 400 रुपये परत करण्यात येतील. जे परीक्षेला बसणार नाहीत, त्यांची फी जप्त करण्यात येईल. गमतीची गोष्ट अशी आहे, की सन 2016 आणि 2017 मध्ये फी वाढीसाठी कोनतेही नोटीफिकेशन काढण्यात आले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सन 2015 पर्यंत एससी आणि एसटी उमेदवारांकडून परीक्षा फी घेतली जात नव्हती, मात्र 2018 पासून त्यांच्याकडून 250 आणि इतरांकडून 500 रुपये परीक्षा फी घेतली जाऊ लागली. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची फी परत करण्याची (एससी आणि एसटी उमेदवारांना रु.250/- आणि इतरांना रुपये 400/-) अट होतीच.

परीक्षा देण्यात रुची नसलेले उमेदवारही परीक्षा फॉर्म भरतात त्यामुळे बोर्डाचे काम आणि खर्च वाढतो, त्यावर नियंत्रण यावे यासाठी फी वाढवण्यात आल्याचे रेल्वे बोर्डाचे संचालक नीरज कुमार यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)