पाच वर्षाच्या मुलाला उंचीवर चढवणे यात कोणते साहस आहे?

उच्च न्यायालायचा आशिष शेलार यांना सवाल

मुंबई: काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दहीहंडी उत्सवावरून मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला धारेवर धरले असल्याचे दिसत आहे. कारण पाच वर्षाच्या मुलाला उंचीवर चढवणे यात कोणते साहस असल्याचा सवाल न्यायालयाने सरकारला विचारला आहे. तसेच साहसी क्रीडा प्रकार म्हणजे काय? असे सवाल करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
आजची सुनावणी करत असताना भाजप आमदार आशिष शेलार यांनी यापुढे दहीहंडीच्या कार्यक्रमाला जाताना काळजी घेण्याचे आदेशदेखील न्यायालयाने दिले आहेत.
दहीहंडीला साहसी क्रीडा प्रकार म्हणून घोषित करा, अशी मागणी राज्य सरकारने केली आहे. मात्र सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी दहीहंडीत लहान मुलांच्या समावेशाला विरोध करत, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. दहीहंडीपर्यंत न्यायालयाने घातलेल्या निर्बंधात बदल न झाल्यास राज्य सरकार अध्यादेश काढेल, असे आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सांगितले होते. त्यावरच सुनावणी करत न्यायालयाने आज सरकारला चांगलेच सुनावले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)