पाच वर्षांनंतर पूनम धिल्लनचे होणार कमबॅक

पूनम धिल्लन 2013 साली श्रृती हसन आणि गिरीश कुमारच्या “रमैया वस्तावैया’ या सिनेमामध्ये आईच्या रोलमध्ये दिसली होती. नायिका म्हणून पूनमने काम थांबवल्याच्या जवळपास दोन दशकांनंतर तिचा हा सिनेमा आला होता. मात्र त्यानंतरही पाच वर्षे ती सिनेमामध्ये कोठेच दिसली नाही. आता लव रंजनच्या प्रॉडक्‍शनच्या “ब्लेम इट ऑन संजोग’मध्ये ती पुन्हा दिसणार आहे. याही सिनेमामध्ये पूनम आईच्याच रोलमध्ये असणार आहे.

मात्र यावेळी ती पंजाबी असणार आहे. या सिनेमाचे मुंबईत शुटिंगही सुरू झाले आहे. शुटिंगचे दुसरे शेड्युल दिल्लीमध्ये होणार आहे. या सिनेमात पूनम आणि सुप्रिया पाठक या घट्ट मैत्रिणी असल्याचे दिसणार आहे. मात्र काही कारणामुळे दोघींची दोस्ती अगदी दुश्‍मनीमध्ये बदलून जाते. या दोघींची मुले एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि येथूनच सिनेमाची खरी कथा सुरू होते. पूनम आणि सुप्रियाव्यतिरिक्‍त सन्नी आणि सोनाली सेहगल ही युवा जोडीही सिनेमात असेल.

गेल्या पाच वर्षात पूनमला सिनेमांच्या अनेक ऑफर आल्या. मात्र त्यात आपल्याला इंटरेस्ट वाटला नसल्याचे तिने सांगितले. पूनमचा मुलगा अनमोल ठकेरिया हा संजय लिला भन्साळीच्या “ट्युजडे ऍन्ड फ्रायडे’मधून पदार्पण करतो आहे. त्याचवेळी पूनमही कमबॅक करते आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)