पाच लाखांसाठी महिलेचा छळ

पिंपरी – विवाहितेला माहेरहून पाच लाख रुपये आणण्यास सांगितले. विवाहितेने नकार दिल्याने पती, सासू आणि सासरा या तिघांनी मिळून तिला कामाला जाऊन पैसे आणून दे, अशी विक्षिप्त मागणी केली. तसेच यावरून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. हा प्रकार पिंपरी मधील शिवानंदन हाऊसिंग सोसायटी येथे घडला.

याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती कपिल ईश्वरलाल हुंदलानी (वय-29), सासू सोना ईश्वरलाल हुंदलानी (वय-47) आणि सासरा ईश्वरलाल हुंदलानी (वय-53, सर्व रा. शिवनंदन हाऊसिंग सोसायटी, वाघेरे कॉलनी, पिंपरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींनी विवाहितेकडे पैशांची मागणी करत घराबाहेरही हाकलून दिले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)