पाच लाखांसाठी नवविवाहितेचा विष पाजून खून

कर्जत – मोबाइल शॉपी सुरू करण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणत नाही म्हणून नवविवाहितेला विष पाजून खून करण्याचा प्रकार मांदळी (ता. कर्जत) येथे झाला. तशी फिर्याद विवाहितेच्या वडिलांनी कर्जत पोलिसांत दिली आहे. आरोपींच्या अटकेसाठी आज (दि. 24) संध्याकाळी पाचच्या सुमारास संतप्त नातेवाईकांनी नवविवाहितेचा शवविच्छेदनानंतरचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर रुग्णवाहिकेत ठेऊन रास्तारोको केला. आरोपी पतीच्या अटकेनंतर आंदोलन थांबवत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह तिच्या सासरी (मांदळी) नेण्यात आला.
मृत विवाहितेचे वडील हरिदास जाधव (रा. पाटेवाडी, ता. कर्जत) यांनी कर्जत पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत हकीकत अशी, मांदळी (ता.कर्जत) येथील नवविवाहिता पल्लवी अक्षय गांगर्डे हिला शुक्रवारी (दि. 23) विषारी द्रव पाजण्यात आला. आज (दि. 24) तिचे निधन झाले. यातील आरोपी पती अक्षय बापू गांगर्डेने तिला विष पाजल्याचा आरोप आहे.
आरोपीच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोरील रस्ता अडवून संतप्त नातेवाईकांनी आंदोलन सुरू केले. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता. अडीच तासांच्या आंदोलनानंतर आरोपीच्या अटकेची खात्री झाल्यावरच आंदोलन बंद केले गेले.
दरम्यान, ही घटना समजताच शिवसेना नेते बळीराम यादव व तालुकाप्रमुख दीपक शहाणे, कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब साळुंके पोलीस ठाण्यात आले. त्यांनी मयताच्या नातेवाईकांना मदत करताना आरोपीला तातडीने अटक करण्यासाठी भाग पाडले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)