पाच रुपयात चपाती भाजी नाविन्यपूर्ण उपक्रमाचा चंद्रकांत पाटलांच्या हस्ते शुभारंभ

कोल्हापूर –  कोल्हापूरच्या संवेदना सोशल फाऊंडेशनच्या  वतीने शाहुपूरीतील विद्या प्राबोधिनी येथे शहरातील गोर गरीब गरजुंसाठी सुरू  केलेल्या 5 रुपयात चपाती भाजी या सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी  शहरातील झोपडपट्टीतील मुली आणि महिलांसाठी दर सहा महिन्यानी दातांचे क्लिनिंग विनामुल्य करण्याचा उपक्रम हाती घेतला जाईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना केली.

येथील संवेदना सोशल फाऊंडेशनच्या  वतीने शाहुपूरीतील विद्या प्राबोधिनी येथे शहरातील गोर गरीब गरजुंसाठी सुरू  केलेल्या 5 रुपयात चपाती भाजी या सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. या समारंभास अंजली चंद्रकांत पाटील, संवेदना सोशल फाऊंडेशनचे  अध्यक्ष राहूल चिक्कोडे, विशेष लेखा परीक्षक बाळासाहेब यादव, स्थायी समितीचे सभापती अशिष ढवळे, मुख्यमंत्री सहायता कक्षाचे कोल्हापूरचे प्रमुख विजय जाधव,  भावेश, अनंत खासबागदार यांच्यासह फाऊंडेशनचे  पदाधिकारी, नगरसेवक तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या सहा महिन्यापूर्वी सामाजिक भावनेतून शहरातील झोपडपट्टीतील मुलींच्या  वाकडे झालेल्या दातांची शस्त्रक्रिया करुन दातांना क्लिप लावण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविला असून 22 मुलींच्या दातांना क्लिप बसविण्यात येत असून, आतापर्यंत 18 मुलींना दातांच्या क्लिप बसविण्यात आल्या आहेत. यापुढील काळातही हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जाईल, असेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

समाजात जे जे कमी आहे ते ते पूर्ण करण्याचा संकल्प असल्याचे सांगून  चंद्रकांत पाटील म्हणाले, गेल्या तीन वर्षात शहर वासियांसाठी अनेकविध सामाजिक उपक्रम हाती घेतले असून ते यशस्वी झाले आहेत. यापुढेही समाजात जे जे कमी आहे ते शोधून नाव उपक्रम राबिवण्यावर भर दिला जाईल. याच सामाजिक भावनेतून संवेदना सोशल फाऊंडेशनच्या  वतीने गरीब, गरजुं बरोबरच ज्येष्ठ नागरीकांसाठी 5 रुपयात चपाती भाजी हा अभिनव उपक्रम हाती  घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)