पाच रुपयाचा पॉपकॉर्न 250 रुपयाला कसा?

थिएटर्समधील खाद्यपर्थांच्या किंमतीवर सरकारचे नियंत्रण का नाही ?


उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

मुंबई – मल्टिप्लेक्‍स थिएटरच्या बाहेर 5 रूपयाला मिळणाऱ्या पॉपकॉर्नचे पॅकेट मल्टिप्लेक्‍स थिएटरमध्ये 250 रूपयांना कसे काय विकले जाते? तो अधिकार त्यांना कोणी बहाल केला? असा खडा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. अशा पध्दतीने चढ्या किंमतीत खाद्यपदार्थाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करता येऊ शकते काय? अशी विचारणा न्यायालयाने केली आहे. राज्य सरकारला त्याबाबत चार आठवड्यात माहिती देण्याचे निर्देशही दिले आहेत.

थिएटर्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ वा पाणी आणण्यास मनाई करण्याची कायद्यात कुठेही तरतूद नाही, असा दावा करून शहरातील रहिवासी जैनेंद्र बक्षी यांच्यावतीने ऍड. आदित्य प्रताप यानी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर न्या. रणजित मोरे आणि न्या. अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठा समोर आज सुनावणी झाली.
एखाद्या व्यक्तीला तब्बेतीच्या कारणामुळे जर बाहेरचे अन्न चालणार नसेल तर घरचे पदार्थही नेण्यास मनाई केल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी मल्टिप्लेक्‍सच्या संघटनांनी हस्तेक्षेप केला. आम्ही कुणावरही मल्टिप्लेक्‍समध्ये खाद्यपदार्थ विकत घेण्यासाठी सक्ती करत नाही. त्या घेणे न घेणे याचा निर्णय लोकांनी घ्यावा. अशी भुमिका घेतली.

याची दखल घेत मुंबईसह राज्यभरातील मल्टीप्लेक्‍स थिएटरमध्ये विकले जाणारे अन्नपदार्थ अव्वाच्या सव्वा किंमतीत का विकले जातात? असा सवाल न्यायालयाने केला. तसेच जर लोकांना त्यांच्या घरचे अन्नपदार्थ मल्टीप्लेक्‍समध्ये आणू जाऊ दिले जात नाहीत, तर मग तिकडे खाजगी व्यावसायिकांना अन्नपदार्थ विकण्याची परवानगी कशी दिली जाते? अशी विचारणा राज्य सरकारकडे केली.

अशा पध्दतीने भरमसाठ किंमतीमध्ये खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या मल्टिप्लेक्‍स थिएटर मालकांविरोधात मुंबई पोलिस कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते का? अशी विचारणा राज्य सरकारकडे केली. त्यासंदर्भातील माहिती चार आठवड्यात सादर करण्याचे निर्देशही दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)