पाच फुटांच्या गाईला 15 फुटांचं रेडकू कसं होईल ? भुजबळांचा खोचक प्रश्न !

गुहागर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सदन घोटाळ्याप्रकरणी सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला आहे. 100 कोटींचं कंत्राट दिलं असताना 850 कोटी कसे काय खर्च होतात, असे विचारात पाच फुटांच्या गाईला 15 फुटांचं रेडकू कसं होईल ? असा खोचक प्रश्न करत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.

‘महाराष्ट्र सदन घोटाळ्यात 25 हजार कोटी खाल्ले असं बोलतात. मग म्हणाले 10 हजार कोटी खाल्ले. आता म्हणतात 850 कोटी….अरे कंत्राट फक्त 100 कोटींचं होतं. ज्याने महाराष्ट्र सदन बांधलं तो कोकणात जाऊन बसला आहे. ज्याने इतकी सुंदर इमारत बांधली त्याला एक रुपयादेखील दिला नाही. तो माणूस मला 850 कोटी रुपये कसा देईल ?’असा प्रश्न देखील भुजबळ यांनी उपस्थित केला.

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमधे राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा दाखल झाली. परिवर्तन झाल्याशिवाय आता राष्ट्रवादी स्वस्थ बसणार नाही असा एल्गार उपस्थित समुदायासमोर सर्व नेत्यांनी दिला.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, विधिमंडळ नेते आ. अजित पवार, ज्येष्ठ नेते आ. छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, ज्येष्ठ नेते सुनील तटकरे, महिला अध्यक्ष चित्रा वाघ या नेत्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह कोकणातील उपस्थितांना हे सरकार का बदलणे आवश्यक आहे याची कारणं समजावून सांगितली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
7 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)