माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी (दि.१६) निधन झाले. यानंतर देशभरातूनच नव्हे तर जगातूनही शोक व्यक्त करण्यात आला. अनेक बॉलीवूड कलाकारांनीही अटलजींना ट्वीटद्वारे श्रद्धांजली दिली. परंतु, भाईजान सलमान खानने पाच दिवसानंतर अटलबिहारी वाजपेयींना ट्विटरवर श्रद्धांजली वाहिली. यावर युझर्सनी सलमानला चांगलेच ट्रोल केले.

सलमान खानने मंगळवारी ट्विट करत ‘देशाने एका मोठ्या व्यक्तीला गमावले’ असल्याचे म्हटले. यावर नेटकऱ्यांनी सलमानला झापण्यास सुरुवात केली. एका युझरने इतके दिवस झोपला होतास का ? असा प्रश्न विचारला. तर इतक्या मोठ्या नेत्याच्या निधनावर शोक व्यक्त करण्यासाठी इतके दिवस का लागावेत, असाही प्रश्न अनेकांनी विचारला आहे. दरम्यान, सलमानला याआधीही नेटकऱ्यांनी लक्ष्य केले होते. ‘रेस-३’ या चित्रपटावेळी नेटकऱ्यांनी दिलेले रिव्ह्यू चांगलेच प्रसिद्ध झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)