पाच दिवसांत 18 हजार विद्यार्थ्यांना लसीकरण

खटाव तालुक्‍यात व्यापक जनजागृतीचा परिणाम

मायणी – आरोग्य विभागाने नियोजनबध्द कार्यक्रम आखत व्यापक जनजागृती केल्याने गोवर, रूबेला लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. याअंतर्गत गेल्या पाच दिवसांत खटाव तालुक्‍यातील 126 शाळांमधील एकूण 17 हजार 682 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शेख यांनी दिली. शासनाच्यावतीने गोवर व रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला आहे.

-Ads-

या पार्श्‍वभूमिवर आरोग्य विभागाने अगदी अंतीम टप्प्यापर्यंत व्यापक जनजागृतीची मोहीम राबवून लोकांच्या मनातील गैरसमज दूर केले. त्यामुळे गोवर, रूबेलाच्या लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्व शाळा व इतर लसीकरण उद्दिष्टप्रमाणे 100 टक्के पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील पाल्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याचे लसीकरण झाले पाहिजे यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शेख यांनी केले
आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)