पाच दिवसांत रुजू व्हा, अन्यथा परत जा

आंतरजिल्हा बदलीप्रकरणी शिक्षकांना शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे – आंतरजिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांना अखेर शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून पदस्थापना देण्यात आली. त्यानुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन पाच दिवसांच्या आत शाळेमध्ये रूजू व्हावे, असे आदेश जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी दिले आहेत. दरम्यान, जे शिक्षक रूजू होणार नाहीत. त्यांना परत आलेल्या जिल्ह्यात पाठवून द्यावे, असे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार पुढील कार्यवाही ठरेल असे प्राथमिक शिक्षण विभागकडून सांगण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावर्षी पहिल्यांदाच ग्रामविकास विभागाने राज्यातील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने केल्या. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी शिक्षकांची नेमणूकच झाली नाही. त्यामुळे भोर तालुक्‍यात तब्बल 104, वेल्ह्यात 90 शाळांवर शिक्षकच नाहीत. शाळा सुरू होऊन पाच महिने झाले, तरी शाळांना शिक्षक मिळाले नसून शिक्षक विभागाने पर्यायी शिक्षक दिले आहे. दरम्यान, अन्य जिल्ह्यांतून 49 शिक्षक पुणे जिल्ह्यात आले असून त्यांना पदस्थापना देण्यासाठी शिक्षण विभागाने समुपदेशन ठेवले. त्यावेळी शाळांची पाहणी करण्यासाठी एक दिवसाची मुदत शिक्षकांनी घेतली. त्यानंतर दोन वेळा शिक्षकांसाठी समुपदेशन ठेवण्यात आले. परंतु, शिक्षकांनी त्यावर बहिष्कार टाकत “पेसा’ कायद्यानुसार अनुसूचित जमातीच्या शिक्षकांना “पेसा’ कार्यक्षेत्रात पदस्थापना मिळावी अशी मागणी केली. तर ज्याठिकाणी शिक्षक नाहीत त्याठिकाणी पदस्थापना मिळेल, असा पवित्रा जिल्हा परिषद प्रशासनाचा होता. त्यामुळे बदलीप्रकरणाचा चांगलाच गोंधळ उडाला.

अखेर शासनाने दिलेल्या निर्देशानुसार 28 डिसेंबर रोजी सर्व शिक्षकांना पदस्थापन देण्यात आली. त्यामध्ये संवर्ग-1 आणि महिला यांना सर्वसाधारण क्षेत्रात पदस्थापना देण्यात आली आहे. पुढील पाच दिवसांच्या आत या शिक्षकांनी शाळेवर रूजू व्हावे, असे आदेश प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे. जे शिक्षक रूजू होणार नाही, त्यांना परत ज्या जिल्ह्यातून आले तेथे पाठवून द्यावे. एवढच नव्हे, तर त्या जिल्ह्यातही शिक्षक रूजू झाले नाही, तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाई करावी. असे निर्देश शासनाने दिल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

आंतरजिल्ह्यातील 49 शिक्षकांपैकी पहिल्या दिवशी एका महिला शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली आहे. त्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार 48 शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली असून भोर तालुक्‍यात 20 आणि वेल्ह्यात 12 शिक्षक देण्यात आले आहे. तसेच अन्य तालुक्‍यांत गरजेनुसार पदस्थापना देण्यात आली आहे.
– सुनील कुऱ्हाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, पुणे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)