पाच थकबाकीदारांविरोधात महापालिकेची कारवाई

नगर – मालमत्ताकर थकबाकीदारांविरोधात महापालिकेच्या सावेडी प्रभाग समिती कार्यालयाने आज पाच थकबाकीदारांवर कारवाई झाली. त्यात पंजाब नॅशनल बॅंकेच्या शाखेचाही समावेश आहे. पंजाब बॅंकेने कारवाई सुरू होताच थकबाकीचा धनादेश काढून दिला. त्यामुळे पुढील कारवाई टळली, अशी माहिती प्रभाग अधिकारी जितेंद्र सारसर यांनी दिली.
प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शहरातील मालमत्ताकर थकबाकीदारांविरोधात कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. महापालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयांनी सोमवारी पाच ठिकाणी कारवाई केली होती. आज दुसऱ्या दिवशी मंगळवारी सावेडीच्या प्रभाग समिती कार्यालयाने कारवाईचा बडगा कायम ठेवला. चंद्रमा कन्स्ट्रक्‍शनच्या अभिजीत यांचा रेणावीकर कॉलनीतील गाळाच्या 3 लाख 53 हजार 315 रुपयांच्या, कुष्ठधाम रोडवरील पायल अर्पाटमेंट येथील रामा तायगा लोखंडे यांच्या गाळ्याच्या 2 लाख 56 हजार 717 रुपयांच्या थकबाकीपोटी मालमत्ता सील केली. या कारवाईनंतर रजनीगंधी अर्पाटमेंटमधील रवींद्र बाळासाहेब खरडे यांच्याकडे थकीत असलेल्या सुमारे 75 हजार 500 रुपयापोटी फ्लॅट सील करण्यात आला. यानंतर सावेडी प्रभाग समितीच्या पथकाने इंदिरा कॉलनीतील बी. एम. मंडल यांच्याकडील 1 लाख 38 हजार 327 रुपयांच्या थकबाकीपोटी दोन रुम सील करण्यात आल्या. त्यानंतर पथकाने पंजाब नॅशनल बॅंकेच्या शाखेवर सुमारे 4 लाख 76 हजार 276 रुपयांच्या थकबाकीपोटी कारवाईला सुरूवात केली. हिरादेवी काकणी यांनी कारवाई सुरू असतानाच थकबाकीचा धनादेश दिला.
सावेडी उपनगरात मोठ्या प्रमाणात सरकारी कार्यालये आहेत. त्यांच्याकडे सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक थकबाकी आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार असल्याची माहिती सारसर यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस अधीक्षक कार्यालयचा काही भाग, तहसील कार्यालय, सामाजिक वनीकरण, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, भविष्य निर्वाह निधीचे कार्यालय, समाज कल्याण विभागाचे कार्यालय असे आदी कार्यालयांचा यात समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)