पाच ठिकाणचे बॅनर काढले

कराड – कराड नगरपालिकेकडून शहरातील पाच ठिकाणचे बॅनर काढण्यात आले. नगरपालिकेच्या गत पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मासिक सभेत शहराला ठिकठिकाणी लावलेल्या शुभेच्छा फलकांमुळे बकाल स्वरूप येऊ लागल्याचे नगसेवकांनी निदर्शनास आणून दिले होते.

हे फलक काढून टाकावेत अशी मागणीही केली होती. त्यानुसार पालिकेकडून मंगळवारी पाच ठिकाणचे फलक काढण्यात आले. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात आली. यामध्ये कृष्णा नाका, टिळक हायस्कूल, कन्याशाळा, जोतिाबा मंदिर परिसरातील फलक काढण्यात आले. मुकादम अभिजित खवळे व सफाई कामगारांनी या कामी मदत केली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)