पाच जोडप्यांची पहिलीच दिवाळी

दिवाळीचा मंगलमय सण देशभर उत्साहात साजरा केला जात आहे. बॉलीवूडमध्येही दिवाळीची प्रचंड धामधुम आहे. यंदा बॉलीवूडमधील 5 स्पेशल जोड्या पहिल्यांदाच एकत्र दिवाळी साजरी करत आहेत. त्यांची ही पहिली दिवाळी ते कशी साजरी करत आहेत, बघुया.

अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली यांची ही पहिलीच दिवाळी आहे. इटलीमध्ये त्यांचा झालेला विवाह सगळ्या मीडियाने आठवडाभर साजरा केला होता. गेल्यावर्षी त्यांच्या विवाहानंतरची दिवाळी दोघे एकत्र साजरी करू शकले नव्हते. त्यामुळे एकत्र दिवाळी साजरी करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे.

नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांचेही लग्न याच वर्षी झाले होते. त्यामुळे दोघांसाठीही हा पहिलाच दिवाळसण आहे. दीर्घकाळापासून त्यांचे रिलेशनशीप स्टेटस आता मॅरिड असे झाले आहे. नेहा आता लवकरच आई होणार आहे. त्यामुळे हा दिवाळीचा सण त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने स्पेशल असणार आहे.

सोनम कपूर आणि आनंद आहुजा या वर्षी मे महिन्यात विवाहबद्ध झाले. सोनमच्या लग्नामध्ये अख्खे बॉलीवूड सहभागी झाले होते. श्रीदेवीच्या निधनामुळे पुढे ढकलावा लागलेला हा विवाह सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. हे नवदाम्पत्यही यंदा पहिल्यांदाच एकत्र दिवाळी साजरी करते आहे.

एकत्र दिवाळी साजरी करणाऱ्यांमध्ये नवविवाहितांबरोबर देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे भावी दाम्पत्यही आहे. अजून त्यांच्या लग्नाला एक महिना अवकाश आहे. मात्र त्यांच्या विवाहाची तयारी पाहता लग्नसमारंभ हीच मोठी दिवाळी असणार आहे. लग्नासाठी निक भारतात येईल. पण त्या अगोदर प्रियांकाबरोबर दिवाळी एन्जॉय करण्यासाठीही तो येणार असे ऐकले होते.

सरतेशेवटी रणबीर कपूर आणि आलिया भट हे देखील भावी जोडीदार एकत्र दिवाळी साजरी करत आहेत. त्यांचेही लग्न अजून व्हायचे आहे. पुढच्या वर्षी त्यांच्या लग्नाचा मुहूर्त काढला गेला आहे, असे समजले आहे. पण कपूर खानदान आणि भट कुटुंबीयांच्या परवानगीने रणबीर आलियाला एकत्र दिवाळी साजरी करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
109 :thumbsup: Thumbs up
57 :heart: Love
1 :joy: Joy
14 :heart_eyes: Awesome
4 :blush: Great
1 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)