अकलूज- प्रतिनिधी – येथे युवा सेना, योध्दा प्रतिष्ठान आणि दलित महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये पाच जोडपी विवाहबद्ध झाली.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या संस्थांच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन येथील धवल श्रीराम मंदिरात केले होते. त्याठिकाणी भव्य शामियाना उभारण्यात आला होता, शिवाय वऱ्हाडी मंडळींसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. यामध्ये चार हिंदू, तर एक बौद्ध धर्म पद्धतीने विवाह लावण्यात आले.
यावेळी राजाभाऊ खिलारे यांनी प्रास्ताविक करून 2016 पासून स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या प्रेरणेतून हा विवाह सोहळा सुरू केल्याचे आणि त्यातून आत्तापर्यंत 45 विवाह लावल्याचे सांगितले. या विवाह सोहळ्यासाठी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, उर्वशीराजे मोहिते पाटील, बार्शीचे शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, भाजपचे महेश डिंगरे, संतोष सपकाळ, सिनेट सदस्य देवीदास वायदंडे, मनसेचे तालुका अध्यक्ष सुरेश टेळे, नगमा शिवपालक, ज्योती कुंभार, जनसेवेचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव मिसाळ, जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव इंगवले देशमुख, रफीक मोहोळकर, महादेव बंडगर, अण्णा शिंदे, रिपाई नेते विकास धाइंजे, नरेंद्र भोसले, बबनराव मिसाळ, भाजपचे बाळासाहेब सरगर, गोरख जवंजाळ, एस. पी. गायकवाड, अरुण खंडागळे, बचन साठे उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवासेना अकलूज शहर प्रमुख संयोजक शेखर खिलारे, गणेश इंगळे, निहाल शेख, बिपीन बोरावके, दता साळुंखे, गणेश आहेर, ओंकार मोरे, आकाश कदम, पप्पु कुपाडे, धनाजी साठे, अक्षय माने यांनी परिश्रम घेतले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा