पाच घाट, दहा तास, बारा हजार मूर्तींचे दान

पिंपरी – गणरायांच्या मूर्तीचे नदीत विसर्जन करण्याऐवजी मूर्तीदान करावे, ही संकल्पना आता चांगलीच रुजली आहे. यंदा देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांनी घरगुती बाप्पांच्या मूर्तींचे दान केले. संस्कार प्रतिष्ठान आणि टाटा मोटर्स व्हॉलेंटियरिंग या संस्थांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मूर्तीदान उपक्रमाला अनंतचतुर्दशीला भरघोस प्रतिसाद मिळाला. संस्कार प्रतिष्ठानकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील पाच घाटांवर मूर्तीदान उपक्रम राबविण्यात येत आहे. सकाळी आठपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल बारा हजार मूर्ती प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांकडून जमा करण्यात आल्या आहेत. सकाळपासून स्वयंसेवक घाटांवर उपस्थित राहून मूर्तीदानासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करत आहेत.

शहरातील वाल्हेकरवाडी, थेरगाव पूल, बिर्ला घाट, मोरया गोसावी मंदिर घाट, केशवनगर या घाटांवर मूर्तीदान स्विकारण्यासाठी प्रतिष्ठानचे 300 स्वयंसेवक उपस्थित आहेत. सर्व स्वयंसेवक गणेश भक्‍तांना मूर्तीदान करून गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने करण्यासाठी प्रेरित करीत आहेत.

-Ads-

संस्कार प्रतिष्ठानचे मोहन गायकवाड यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना सांगितले की, नदीच्या संरक्षण व संवर्धनासाठी णेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी प्रतिष्ठान दरवर्षी मूर्तीदान उपक्रम राबवित आहे. नागरिक देखील याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात. यावर्षी 15 ते 20 हजाराहून अधिक मूर्ती संकलित होण्याची अपेक्षा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)