पाच कोटींची जेटींग मशीन धूळखात

ठेकेदारांकडून करून घेतले जातेय काम

पुणे –
महापालिकेच्या वाहन विभागाकडून मागील वर्षी 5 कोटी रुपये खर्चून खरेदी करण्यात आलेली जेटींग मशीन बंद अवस्थेत पडून आहे. या मशीनद्वारे संपूर्ण वर्षभरात अवघ्या 80 ठिकाणी नाले, ड्रेणेज तसेच मॅनहोलची सफाई करण्यात आली आहे. मात्र, ती बंद ठेऊन ठेकेदारांच्या मशीनच्या माध्यमातून स्वच्छतेचे काम सुरू आहे. त्यामुळे या प्रकारास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांनी केली आहे.

महापालिकेच्या मोटार वाहन विभागाने केंद्र शासनाच्या “जेएनएनयुआरएम’ योजनेंतर्गत आलेल्या निधीतून मलनिसा:रण विभागाच्या मागणीनुसार, सुमारे 4 कोटी 56 लाख रुपयांना जानेवारी 2018 मध्ये ही मशीन खरेदी केली आहे. त्यानंतर ही मशीन वापरासाठी मलनिसा:रण विभागाकडे देण्यात आली. असे असताना त्याचा वापरच होत नसल्याचे चित्र आहे. बाबर यांनी डिसेंबर महिन्याच्या मुख्यसभेत याबाबत प्रश्‍नोत्तरात ही माहिती विचारली होती. त्यात ही मशीन वर्षभरात केवळ 80 ठिकाणी वापरण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या शिवाय, महापालिकेने हे वाहन खरेदी केल्यानंतर त्याचा वापर करणे अपेक्षीत असताना, प्रशासनाकडून जेटींग मशीनद्वारे शहरात करण्यात येणारे स्वच्छतेचे काम क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून आऊट सोर्सिंगद्वारे करण्यात येत आहे. त्यामुळे या मशीनचा वापरच होत नसून महापालिकेच्या 5 कोटींचा निधी वाया गेला आहे. ही बाब गंभीर असून या प्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी बाबर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)