पाच किलो दागिन्याच्या मोबदल्यात फसवणूक

खडक पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल

पुणे- दागिने बनवण्याचा व्यवसाय असणाऱ्या एकाकडून दहा किलो सोन्याचे दागिने बनवून घेतले. त्याला विश्‍वासात घेऊन दहा किलो दागिन्याच्या बदल्यात पाच किलो फाईन गोल्ड (कच्चे सोने) परत केले. तर उर्वरित पाच किलो दागिन्याची किंमत पैशात देतो असे सांगून ते न देता एकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुजबीर रेहमान शेख याच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नासीर मंडल (45, रा. भवानीपेठ) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार ऑक्‍टोबर 2014 ते मे 2015 दरम्यान घडला. फिर्यादी यांचे गणेशपेठेत मंडल गोल्ड स्मिथ नावाचे सोन्याचे दुकान आहे. दरम्यान, आरोपी शेख व त्याच्या साथीदाराने फिर्यादीकडून 10 किलो 910 ग्रॅमचे सोन्याचे दागिने बनवून घेतले. या बदल्यात फिर्यादीला फाईन गोल्ड (कच्चे सोने) देतो, असे सांगितले. फिर्यादीने त्याच्यावर विश्‍वास ठेवत त्याला दागिने दिले. यानंतर आरोपीने 5 किलो 300 ग्रॅम फाईन गोल्ड फिर्यादीला दिले. व उर्वरित पाच किलो दागिन्यांची किंमत पैशात देतो, असे सांगितले. मात्र, अनेक दिवस उलटूनदेखील फिर्यादीला रुपयाही न देता फसवणूक केली.

आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात येताच त्यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणाचा अधिक तपास खडक पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पांडोळ करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)