पाचुपतेवाडीच्या युवकांनी दाखवला प्रामाणिकपणा

 उंडाळे : आशा धुळप यांची सापडलेली पर्स परत देताना पाचुपतेवाडीचे युवक.

किंमती दागिन्याची पर्स केली घरपोच
उंडाळे, दि. 14 (वार्ताहर) : उंडाळे, ता. कराड येथे आठवडा बाजारासाठी आलेल्या शेवाळवाडी (म्हासोली) येथील आशा रामचंद्र धुळप या महिलेची बाजारात विसरलेली किंमती दागिणे व रोख रकम असलेली पर्स येथील युवकांनी घरपोच करीत आपला प्रामाणिकपणा दाखवला. याबद्दल युवकांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उंडाळे येथे मुख्य बाजारपेठ असून रविवारी आठवडा बाजार भरतो. आठवडा बाजारासाठी विभागातील सुमारे 50 गावातील लोक बाजारासाठी येत असतात. शेवाळेवाडी (म्हासोली) येथील आशा रामचंद्र धुळप या नेहमी प्रमाणे बाजार करण्यासाठी उंडाळेला आल्या होत्या. बाजारहाट झाल्यानंतर त्या बसस्थानकावर बसची वाट पाहत होत्या. बस येताच बसमध्ये बसण्याच्या नादत त्यांची पर्स बसलेल्या जागीच राहिली. दरम्यान, कृष्णत दिनकर मोरे आणि रविंद्र तुकाराम मोरे रा. पाचुपतेवाडी (तुळसण) हे युवक तेथून जात होते. त्यांच्या नजरेस ती पर्स पडली. ती उघडून पाहिली असता त्यात सोन्याचे दागिणे, एक स्मार्ट फोन, तीन हजार रुपये, आधार कार्ड असे आढळून आले. आधार कार्डवर आशा धुळप यांचा शेवाळेवाडीचा पत्ता होता. त्या युवकांनी प्रामाणिकपणे शेवाळेवाडी गाठली व सदरची सापडलेली पर्स आशा धुळप यांच्या घरी जावून देत माणुसकीचे दर्शन दिले. युवकांनी दाखविलेल्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)