पाचशे रुपयांची लाच स्वीकरताना बेलीफला पकडले

लोणी काळभोर – घराशेजारी चाललेल्या बेकायदेशीर बांधकामास मनाई मिळवणेसाठी केलेल्या दाव्याच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या मनाई आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी 500 रूपयांची लाच घेणाऱ्या दिवाणी न्यायालयाच्या बेलीफला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे पोलीस निरीक्षक राजू थानसिंग चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार लाच स्वीकारल्या प्रकरणी शिवाजीनगर पुणे येथील दिवाणी न्यायालयाचे बेलीफ राजू रामचंद्र भुजबळ (वय 40, रा. काळेबोराटे नगर, हडपसर, पुणे) वर कारवाई करण्यात आली आहे. याबाबतची माहिती अशी की, तक्रारदाराच्या घराच्या बाजूला बेकायदेशीर बांधकाम सुरू असल्याने तक्रारदाराने बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यावर शिवाजीनगर (पुणे) येथील दिवाणी न्यायालयात बुधवारी (दि. 9) मनाईचा दावा दाखल केला होता. गुरुवारी (दि. 10) न्यायालयात या दाव्याची सुनावणी होवून न्यायालयाने प्रतिवादी यांना नोटीस काढून सोमवारी (दि. 14) सकाळी 11 वाजता न्यायालयात हजर राहण्याबाबत आदेश दिले, होते. या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी शुक्रवारी (दि. 11) ही नोटीस बेलीफ राजू भुजबळ यांना दिली होती. दरम्यान, तक्रारदाराने यासंदर्भात भुजबळ यांची भेट घेतली असता त्यांनी नोटीस बजावण्यासाठी 500 रूपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने शुक्रवारी (दि.11) प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर तक्राराच्या घरातील कार्यालयाच्या जवळच्या खोलीत सापळा रचण्यात आला. आज (शनिवारी) सकाळी साडेआकराच्याच्या सुमारास तक्रारदाराडून 500 रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)