पाचव्या मजल्यावरुन पडून मजुराचा मृत्यू

वाकड – एका बांधकाम साइटच्या पाचव्या मजल्यावरुन पडून एका 22 वर्षांच्या मजुराचा मृत्यू झाला आहे.
सुबल धिरेन मल्लीक असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी निलेश पोकार या ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे.

शहरात सातत्याने बांधकाम कामगारांचे अपघात होऊन ते जखमी होत आहेत आणि काही मृत पावत आहेत, असे असताना ही कोट्यावधींचे प्रोजेक्‍ट साकारणारे व्यावसायिक कामगारांना काही हजार रुपयांची सुरक्षा साधने उपलब्ध करून देत नाहीत. वाकड येथील घटनेतही असाच प्रकार घडला आणि एका तरुण कामगारास प्राण गमवावे लागले.

प्रुडेन्शिया टॉवर्स या निर्माणाधीन इमारतींच्या साइट्‌वर काम करत असताना सुबल मल्लीक याचा तोल गेल्याने तो कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. मोठा प्रोजेक्‍ट असताना देखील बांधकाम व्यावसायिक, विकसक किंवा कामगार ठेकेदाराने कामगारांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट, सेफ्टी बेल्ट आणि सेफ्टी जाळी अशी कोणतीही साधने पुरविली नाहीत. लिफ्टच्या डक्‍टला झाकण्यात आले नव्हते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)