पाचव्या दिवशी गणरायाचे विसर्जन

आळंदी -येथून जवळच असलेली पॉलीबॉन्ड कंपनीतील गणेशाचे विसर्जन पाचव्या दिवशी करण्यात आले. मंगळवारी ढोल – ताशांचा गजर करीत शेकडो कामगारांसमवेत गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या… असा गजर करीत मिरवणूक आळंदी – मरकळ रोडने इंद्रायणी तिरावर आली. यावेळी इंद्रायणीच्या दोन्ही तिरावर गणेश विसर्जना साठी गणेश भक्तांची अलोट गर्दी झाली होती. विसर्जनावेळी कंपनीचे पर्सनल मॅंनेजर महेंद्र फणसे, शरद राऊत, बाप्पु पवार, ज्ञानेश्वर शेखर, सुनिल मोठे, गणेश तावरे, प्रमोद कोहरे, विश्वास सुपेकर, राकेश बैरागी, हातकर, गाडे, कामगार प्रतिनिधी कैलास सांडभोर, गव्हाणे, पठारे, बटवाल, बच्चन, शेख, झुजम, कुंभारे, बुरडे, पडवळ व कदम आदींसह शेकडो कामगार या मिरवणुकीत सहभागी झाले होते. यानिमित्त कंपनीच्या वतीने रांगोळी स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)