पाचव्या दिवशी उपोषणस्थळी शेळ्या-मेंढ्या दाखल

फलटण ः आंदोलनस्थळी धनगर बांधवांनी मांडलेली चूल.

धनगर समाजाचे आंदोलन सुरूच : आता आमदार-खासदारांच्या घरासमोर चूल मांडणार

फलटण, दि. 2 (प्रतिनिधी) – धनगर समाजाच्या वतीने आरक्षणासाठी सुरू केलेले आंदोलन पाचव्या दिवशीही सुरू होते. गुरुवारी आंदोलकांनी सरकार विरोधात शेळ्या मेंढ्या, घोडे घेवून संपूर्ण कुटूंबासह आंदोलनस्थळी चूल मांडून आंदोलन केले.
आंदोलनाच्या पाचव्या दिवशी धनगर समाजातील काही आंदोलकांनी शेळ्या मेंढ्या, घोडे घेवून संपूर्ण कुटूंबासह आंदोलनस्थळी चूल मांडून आंदोलन केले. यावेळी सरकार विरोधी जोरदार घोषणा देण्यात आल्या. पुढील काळात धनगर समाजाची आरक्षणाची मागणी पूर्ण झाल्यास आमदार व खासदारांच्या घरासमोरच शेळ्या-मेंढ्या, घोडे घेवून कुटूंबासह चूल मांडणार असल्याचा इशारा धनगर समाज आरक्षण कृती समितीने दिला आहे. बुधवारी नांदल ग्रामस्थांच्या वतीने आंदोलनस्थळी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, ना. रामराजे नाईक-निंबाळकर व आ. दीपक चव्हाण यांनी आंदोलनस्थळी भेट देवून आंदोलनास पाठिंबा दिला.
यावेळी धनगर आणि धनगड अशा दोन वेगळ्या जाती असल्याचा सरकारचा दावा असून तसे प्रतिज्ञापत्र आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी हायकोर्टात दिले. मात्र, धनगर आणि धनगड ही फक्त प्रशासकीय चूक आहे. राज्यात एकही धनगड अस्तित्वात नाही. धनगड नावाची जमात महाराष्ट्रात नाही, धनगर आणि धनगड हे वेगळे नसून एकच असल्याचे संशोधकीय अहवाल असतानाही धनगर समाज आदिवाशींचे निकष पूर्ण करतो की नाही यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई या संस्थेला 70 वर्षानंतर सर्व्हे करायला सांगणारे फडणवीस सरकार आरक्षण घशातून काढण्याचा प्रयत्न असल्याची शंका येवू लागली आहे. तथापि, त्यामुळे 1 सप्टेंबरच्या आत चूक दुरुस्त केली नाही तर दीड कोटी धनगर समाजाला रस्त्यावर उतरेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)