लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याला भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन मुकण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या सराव सत्रात अश्‍विन सहभागी झाला नव्हता. त्यामुळे तो पाचव्या कसोटीत खेळणार नसल्याचे म्हटले जात आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्यात अश्‍विनच्या मांडीतील स्नायू दुखावले होते. चौथ्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला अश्‍विनची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीनुसार अश्‍विनला पाच दिवसांची विश्रांती द्यावी लागणार होती. मात्र भारतीय संघव्यवस्थापन आणि कर्णधार विराट कोहली यांनी अश्‍विनला जायबंदी असतानाही चौथ्या कसोटी सामन्यात खेळवले होते.
या गोष्टीचा परिणाम अश्‍विनच्या आणि भारतीय संघाच्या कामगिरीवरही झाला. या सामन्यात अश्‍विनला फक्त तीन बळी मिळवता आले होते. त्याचबरोबर भारतीय संघ अडचणीत असताना फलंदाजीमध्येही त्याला धावा करता आल्या नव्हत्या.

जायबंदी असूनही खेळवल्यामुळे अश्‍विनची दुखापत अधिक चिघळल्याचे असल्याचे सांगण्यात येत आहे. अश्‍विनला यापुढे खेळायचे असेल तर त्याने सक्‍तीची विश्रांती घेणे गरजेचे असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे पाचव्या कसोटी सामन्यात अश्‍विन संघात दिसण्याची शक्‍यता नसल्याचेही वृत्त आहे. अश्‍विनची जागा घेण्यासाठी डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा सज्ज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)