भारत विरुद्ध इंग्लंड त्यांच्यात सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाअखेर इंग्लंडची स्थिती १९८-७ बाद अशी झाली आहे. इंग्लंडने नेणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा नर्णय घेतला. ऍलिस्टर कुक आणि मोईन अली वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळण्यास उतरलेल्या ऍलिस्टर कुकला भारतीय संघाने ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. सुरुवातीला इंग्लंडच्या सलामीवीरांनी आश्वासक सुरुवात केली. जडेजाने  जेनिंन्ग्सला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर मोईन अली फलंदाजीस आला. कुक आणि अली जोडीने आपली अर्धशतके पूर्ण केली.

कुक आणि अलीची जोडी फुटली आणि भारतीय गोलंदाज पुन्हा कसोटी सामन्यात वरचढ झाले. इंग्लंडचा कर्णधार जो रुटला भोपळाही फोडता आला नाही. त्याला बुमराहने बाद केले. जॉनी बेअरस्टोवला देखील शून्यावर बाद व्हावे लागले त्याला इशांत ने यष्टीरक्षक रिषभ पंतकडे झेल देण्यास भाग पडले.एकवेळ इंग्लंड मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत होते पण भारतीयांनी दिलेल्या धक्यातून ते शेवटपर्यंत सावरले नाहीत आणि दिवसाअखेर ७ गड्यांच्या मोबदल्यात १९८ धावांपर्यंतच मजल गाठू शकले.

भारतासाठी इशांत शर्मा याने ३ बळी मिळवले तर रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २खेळाडू बाद केले. उर्वरित फलंदाजांना लवकर बाद करून आपल्या धावसंख्येला आकार देण्याचे लक्ष्य समोर ठेऊन भारतीय संघ मैदानात उतरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)