पाचवडमध्ये सेवा रस्त्यावर खड्डेच खड्डे

पाचवड – पाचवड, ता. वाई येथील सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्ड्यामुळे वाहनधारकांना वाहने चालवितानाही कसरत करावी लागत आहे. विशेषत: महामार्गावरुन पाचवड गावाच्या दिशेने जाणाऱ्या सेवारस्त्यावर असलेल्या स्पीडब्रेकरला लागून खड्ड्यांचे साम्राज्यच निर्माण झाले आहे.

दरम्यान, संबंधित विभागाने तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्‍यक होते. परंतु, तसे होत नसल्याने याठिकाणी अपघाताची शक्‍यता निर्माण झाली आहे. मुळातच ठेकेदार असलेल्या रिलायन्स कंपनीने हे काम दर्जाहिन केल्यामुळेच येथील रस्ताची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे याठिकाणी अपघात झाल्यास अथवा जीवितहानी झाल्यास संबंधित ठेकेदार कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणी होत आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)