पाचघर येथे विजेच्या धक्‍क्‍याने मुलाचा मृत्यू

ओतूर-पाचघर येथे विजेचा धक्‍का बसून एका मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 25) सकाळी साडेदहाच्या दरम्यान पाचघर (ता. जुन्नर) येथे घडली. प्रतीक अशोक डोके (वय 15, रा. पाचघर, वडशेत ता. जुन्नर) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. प्रतीक हा आंबेगव्हाण येथील शारदाबाई पवार विद्यालयात इयत्ता नववीत शिकत होता. याबाबत ओतूर पोलीस ठाण्याचे हवालदार टी. डी. दाते यांनी दिलेल्या माहिती अशी की, प्रतीक डोके याला साडेदहाच्या दरम्यान विजेचा धक्‍का बसला. त्यामुळे तो जमिनीवर पडला. तात्काळ त्याला रुग्णवाहिकेमध्ये ओतूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. अशी खबर पोपट नामदेव डोके (वय 27) यांनी ओतूर पोलीस ठाण्यात दिली. याबाबत ओतूर पोलिसांनी आस्कमित मृत्यूची नोंद केली. पुढील तपास ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार ज्ञानेश्वर माळी करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)