पाचगणी-महाबळेश्‍वर रस्त्यावर अनधिकृत टपऱ्या

-प्रशासनाकडून दुर्लक्ष
-स्थानिकांमध्ये संताप

पाचगणी – महाबळेश्‍वरकडे जाणाऱ्या मार्गावर पाचगणी ते महाबळेश्‍वरदरम्यानच्या रस्त्यालगत अनधिकृत टपऱ्यांचे पेव वाढत आहेत. रस्त्यालगतच प्रशासनाच्या परवानगीशिवाय काहीजणांनी स्टॉल उभे करुन व्यवसाय सुरु केल्याने भविष्यात या मार्गावर आणखी अतिक्रमणे वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मात्र, बांधकाम विभागासह प्रशासनाकडूनही या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करत संबंधित अतिक्रमणधारकांना अभय देण्याचा प्रकार सुरु असून यामध्ये काही तडजोडीच्या गोष्टी आहेत की काय? अशी चर्चा सुरु झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पांगरी ता. महाबळेश्‍वर-पाचगणी महाबळेश्‍वर या मुख्य रस्त्यावर भिलार वॉटरफॉल हे प्रेक्षणीय स्थळ असून या ठिकाणी पर्यटक थांबून निसर्गाचा आनंद लुटत असतात. त्याचाच गैरफायदा घेत काही व्यावसायिकांनी या रस्त्याकडेला अनधिकृत स्टॉल उभारले आहेत. या अतिक्रमणधारक स्टॉलधारकांनी रस्त्याकडेला कचरा टाकत असल्याने या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य वाढत आहे. पांगरी हे निर्मल ग्राम विजेते गाव असून या ठिकाणी पडरणाऱ्या कचऱ्याला आळा कसा घालायचा? असा प्रश्‍न ग्रामस्थांना पडला आहे.

मुळातच मार्गालगत असणाऱ्या टपऱ्या कोणत्याही परवानगीशिवाय टाकण्यात आल्या आहेत. याबाबत बांधकाम विभागाकडूनही दुर्लक्ष केले जात असून बांधकाम विभागाच्याच वरदहस्ताने ही अतिक्रमणे करण्यात आली नाहीत ना? असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

या स्टॉलमध्ये एकही स्थानिक व्यावसायिक नसून पांगरी हद्दीबाहेरल व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडून स्थानिकांना दमदाटी केली जात आहे. सदर ग्रामपंचायतीने एप्रिल 2018 मध्ये या ठिकाणी स्थानिकांव्यतिरिक्त इतर कोणी व्यवसाय करण्यात बंदी घालण्यात आली आहे. असा ठराव करण्यात आलेला आहे. सदर हे स्टॉल हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असून या स्टॉलची ना बांधकाम विभागाकडे, ना ग्रामपंचायत कार्यालयडे कोणत्याही प्रकरचे परवाना घेतला नसल्याचे समजते.

आम्ही या अनधिकृत स्टॉलधारकांना नोटीस बजावले आहे. त्यांच्यावर लवकरच कारवाईसुद्धा करणार आहोत व संबंधित स्टॉल तिथून हटवणार आहोत.
एम. व्ही. गोंजारी
सार्वजनिक बांधकाम विभाग.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)