पाचगणी पालिकेचे कर्मचारीही संपावर

पाचगणी – पाचगणी (ता. महाबळेश्‍वर) गिरीस्थान नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यानी आपल्या विविध मागण्यासाठी संपावर जात काम बंद आंदोलन करून पालिका कार्यालयसमोर धरणे आंदोलन केले. त्यामुळे आज नवीन वर्षातील पहिल्याच दिवशी काम बंद असल्याने या संपाचा फटका मात्र सर्व सामान्य नागरिकाना बसला आहे. शासनाने नगरपालिका कर्मचाऱ्यांना सातव्या आयोगात स्थान न दिल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. यावेळी मुख्याधिकारी याना याबाबत निवेदन देण्यात आले.

जोपर्यंत यावर निर्णय होत नाही तोपर्यंत बेमुदत संपावर राहणार असल्याचा इशारा यावेळी सूर्यकांत कासुर्डे यांनी दिला. यावेळी पालिका कर्मचारी सूर्यकांत कासुर्डे, स्वप्नील सूर्यवंशी, जगदीश भगत, सुरेश मडके, संदीप बगाडे, नथुराम शिंदे, प्रकाश हिरवे, राजश्री सणस, अशपाक पठाण, नितीन मर्ढेकर, कालिदास शेंडगे, जयंती गुजर सहभागी झाले होते.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)