पाचगणी परिसरात अनधिकृत बाधकांमाचा सुळसुळाट

धनदांडग्यांना लगाम घालण्याची गरज, प्रशासनाची गांधारीची भूमिका

सचिन भिलारे 

पाचगणी –
महाबळेश्वर तालुका हा इको सेन्स्टिव्ह तालुका आहे. महाबळेश्‍वरसह पाचगणी परिसरात धनदांडग्यानी या परिसरात आपले अनधिकृत बांधकामाचा सपाटा लावला असून महसूल विभागाचा या बांधकामांना अभय मिळत आहे. अनधिकृत बांधकामे दिसूनही प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने प्रशासनाने गांधारीची भूमिका घेतली आहे का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. महाबळेश्वर तालुक्‍यात बांधकाम करणे, उत्खनन करणे, वृक्षतोड करणे यावर शासनाने कडक निर्बंध घातले असताना या तालुक्‍यात कवडी मोलाने जागा खरेदी करून या जागेवर इमलेच्या इमले बांधून वृक्षाचे जगलाच्या ठिकाणी सिमेंटचे जगलाचा घाट घातला जात आहे.

पाचगणी परिसरात धनदांडगे जागा खरेदी करुन अनधिकृत बांधकामे करत असल्याचे प्रकार सुरु आहेत. याची संबंधित प्रशासनाला कल्पना असतानादेखील त्यांच्याकडून डोळेझाक सुरु आहे. अशा बांधकामवर थातुरमातुर कारवाई करून या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या कारवाईबाबतच नागरिकांमध्ये संशय व्यक्त होऊ लागला आहे. विशेष म्हणजे धनदांडग्यांकडून मलिदा लाटण्याचा प्रकार सुरु असल्याच्या चर्चादेखील नागरिकांमध्ये सुरु आहेत.
महाबळेश्वर तालुका हा बांधकाम विषयी अतिसंवेदनशील असतानाच या परिसरात धनदांडग्यांबरोबरच काही राजकीय नेते यांनी या भागात आपले इमलेच्या इमले बांधून उत्खनन करून आपले बांधकाम पूर्ण करताना दिसत आहे. तसेच बांधकामात अडथळा येऊ नये यासाठी राजकीय दबावतत्राचाही वापर सुरु आहे.

एकीकडे पर्यावरण वाचले पाहिजे म्हणून त्यासाठी हाक द्यायची आणि दुसरीकडे या ठिकाणी व्यवसायांच्या स्वरूपात येथील निसर्गाचे विद्रुपीकरण करून या परिसरातला बकाल करायची स्पर्धाच येथे सुरू आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी अनधिकृत बांधकाम डोगर पोखरणे उत्खनन, वृक्ष तोड या सर्वच गोष्टीवर नियंत्रण आण्यण्याची गरज आहे. अन्यथा दोन्ही शहरे बकाल होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. महसूल विभागाने याकडे गांभियाने लक्ष घालून संबंधित बांधकामावर बडगा उगारावा, अशी मागणी पर्यावरण प्रेमी करत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)