पाचगणीत ध्वनी प्रदूषणांतर्गत सात जणांवर गुन्हा

पाचगणी- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयतीच्या मिरवणुकीत डॉल्बी सिस्टमवर कार्यवाही करत सात जणांनावर ध्वनी प्रदूषण अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माहिती अशी की, पाचगणी येथील स्वस्तिक मेडिकल समोरील रोड मिरवणूक मार्गावर मर्यादेपेक्षा जास्तृ आवाज करून साऊंड सिस्टम लावला होता.

ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करत सार्वजनिक उपद्रव केला आहे, अशी फिर्याद विशाल विजय येवले यांनी पाचगणी पोलीस ठाण्याला दिली. यापूर्वी पोलिसांनी या मंडळांने वारंवार सूचना देऊनही दूर्लक्ष करीत साउंड सिस्टम तशीच चालूच ठेवला. पंचशील युवक मंडळ, अध्यक्ष संकेत अशोक परिहार, टॅक्‍टर चालक दत्तात्रेय गेनूबा आमराळे, जनरेटर गाडीचालक जयराम गायकवाड, डॉल्बी मालक मयूर मखवाल, आयुष यशवंत चव्हाण, अमोल कांबळे, कुमार कांबळे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, सहायक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे हे तपास करत आहे.

-Ads-

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)